esakal | भले शाब्बास! पुसद नगरपालिका म्हणे पहिला नंबर!
sakal

बोलून बातमी शोधा

pusad

या स्पर्धेत नागरिकांचा सहभाग, नगरपालिकेचे डॉक्‍युमेंट्‌स, कचरामुक्त बंधनमुक्त शहराची रॅकिंग, परीक्षकाची तपासणी अशा चार भागात सहा हजार गुणांची विभागणी केलेली होती. यात नगरपालिकेच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे एकूण तीन हजार २२३ गुण पुसद पालिकेला प्राप्त झाले.

भले शाब्बास! पुसद नगरपालिका म्हणे पहिला नंबर!

sakal_logo
By
सुरज पाटील

पुसद (यवतमाळ) : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुसद नगरपालिकेने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. पश्‍चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या राज्यातील ५० हजार ते एक लाख लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. पुसद नगरपालिकेने विभागीय पातळीवर पाचवा तर देश पातळीवर ५५ क्रमांक मिळविला आहे.

या स्पर्धेत नागरिकांचा सहभाग, नगरपालिकेचे डॉक्‍युमेंट्‌स, कचरामुक्त बंधनमुक्त शहराची रॅकिंग, परीक्षकाची तपासणी अशा चार भागात सहा हजार गुणांची विभागणी केलेली होती. यात नगरपालिकेच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे एकूण तीन हजार २२३ गुण पुसद पालिकेला प्राप्त झाले. पुसद नगरपालिकेने कागदपत्रांची योग्य हाताळणी, नागरिकांचा फिडबॅक, स्वच्छता ऍप्सचा उपयोग व ऑनलाइन तक्रारीवरून तत्काळ निवारण, या बाबतीत नगरपालिकेने चांगली आघाडी घेतली. तपासणी पथकाच्या ही बाब प्रामुख्याने लक्षात आली.

यापूर्वीच्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत पुसद नगरपालिकेने भारतात ३७६ व क्रमांक प्राप्त केलेला होता. यंदा मात्र पालिकेने आपल्या कामगिरीत
भरीव सुधारणा केली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी
नियोजन पद्धतीने केलेले काम, पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचारी यांनी मनापासून केलेल्या सहकार्यामुळे नगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी घेतली आहे. नगरपालिकेची सर्व चमू व नागरिकांचे सहकार्य लाभले.
अनिता मनोहर नाईक
नगराध्यक्ष, पुसद

सांघिक प्रयत्न
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात नगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व चमूने राबविलेल्या सांघिक प्रयत्नातून हे यश संपादन करता आले. यापुढे नागरिकांना स्वच्छता, आरोग्य या सुविधा सक्षमपणे पुरविण्याचा व या स्पर्धेत पुढील वर्षात वरचा रॅंक मिळविण्यासाठी प्रयत्न करू.
डॉ. किरण सुकलवाड, मुख्याधिकारी, नगरपालिका, पुसद

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top