Video : धक्कादायक! विलगीकरणातील तरुणाने केली आत्महत्या

सुमित हेपट
Saturday, 16 May 2020

 तालुक्यातील गोंडबुरांडा येथे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या तरुणाने  गावाजवळील तलावाच्या किनारी गळफास लाऊन आत्महत्या केली.

मारेगाव (यवतमाळ) : कोरोना आणि टाळेबंदीने अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. काही जण आर्थिक अडचणीत आहेत तर काही मानसिक दडपणात. यातून काही गुन्हेही घडताहेत. अशाच तणावातून नुकतीच एक आत्महत्याही घडली.

 तालुक्यातील गोंडबुरांडा येथे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या तरुणाने  गावाजवळील तलावाच्या किनारी गळफास लाऊन आत्महत्या केली. येथील तीन युवक अहमदनगर जिल्ह्यातील एका कंपनीत काम करीत होते. सोमवार, ता.११ ला ते स्वगृही परतल्यानंतर त्यांना विलगीकरणात गावातील शाळेत ठेवण्यात आले होते. त्यांची जेवणाची  व्यवस्था घरुनच होत होती. ता.१४ रोजी सकाळी दहाच्या दरम्यान  हा युवक विलगीकरणातील दोघांना शौचास जातो असे सांगुन निघुन गेला. ही बाब ग्रामस्थांना सांगुन शोधाशोध घेतली असता थांगपत्ता लागला नाही. येथील पोलिस पाटलांनी ता.१५ ला पोलिसात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी शोधकार्य राबविले.

सविस्तर वाचा - दीड महिन्यापासून बंद दुकाने उघडली आणि...

आज ता.१६ रोजी शेतशिवारातील तलावाजवळ झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निर्दशनास आले. रामु  आत्राम वय २३ असे मृतकाचे नाव असुन  हालाखीची परस्थिती असलेल्या कुटुंबातील  होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine youth commite sucide