esakal | वणीत जुगार अड्ड्यावर छापा; तिघांना अटक, तर ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

raid on gambling center in wani of yavatmal

दुबईत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान सट्टाबाजाराला चांगलाच उत आला आहे. प्रत्येक सामन्यावर कोट्यवधींचा जुगार खेळला जात आहे. तालुक्यातील इंदिरा सुतगीरणीच्या मागे शिरगिरी जंगल परिसरात क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली

वणीत जुगार अड्ड्यावर छापा; तिघांना अटक, तर ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
चेतन देशमुख

वणी (जि. यवतमाळ): आयपीएल सामन्यादरम्यान सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत नऊ लाख 70 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डिबी पथकाने रविवारी (ता.18) रात्रीच्या सुमारास केली. या कारवाईमुळे सट्टाबाजारात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

सय्यद मिनाज सय्यद मुमताज (वय 31), जमशेद हुसेन राशीद हुसेन (वय 23), मंगल विठ्ठल खाडे (वय 32,  सर्व रा. वणी), अशी अटक केलेल्यांची नावे आहे. दुबईत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान सट्टाबाजाराला चांगलाच उत आला आहे. प्रत्येक सामन्यावर कोट्यवधींचा जुगार खेळला जात आहे. तालुक्यातील इंदिरा सुतगीरणीच्या मागे शिरगिरी जंगल परिसरात क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शोध पथकाला छापा टाकण्याचे निर्देश दिले. सामना सुरू असताना प्रत्येक क्षणाला मोबाइलवरून हारजीतचा जुगार खेळताना तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून आठ मोबाईल संच, चारचाकी कार, जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, रोख एक हजार 250 रुपये, असा एकूण नऊ लाख 70 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांविरुद्घ वणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आली. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली.