
अमरावती : अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या मोर्शी येथील दोन सावकारांच्या निवासस्थानी सहकार विभागाने छापे घालून आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केले. यामध्ये कोरे धनादेश, कोरे स्टॅम्पपेपर, इसार पावती, नोंदवही या साहित्याचा समावेश आहे. मोर्शी येथे सावकारी छाप्याची महिनाभरातील ही दुसरी वेळ आहे.