esakal | दपूमरेने फुकट्यांविरुद्ध थोपटले दंड
sakal

बोलून बातमी शोधा

दपूमरेने फुकट्यांविरुद्ध थोपटले दंड

दपूमरेने फुकट्यांविरुद्ध थोपटले दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने फुकट्यांविरोधात दंड ठोपटले असून दहादिवसीय विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले जात आहे. त्यात प्रारंभीच्या दोनच दिवसांमध्ये सुमारे 2 हजार फुकट्यांवर कारवाई करण्यात आली.
21 ऑगस्टपासून सुरू झालेले हे अभियान 30 पर्यंत राबविले जाणार आहे. या मोहिमेत विनातिकीट प्रवासी, अनधिकृत डब्यातून प्रवास करणारे, विनानोंदणी माल वाहतूक करणारे तसेच अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पहिल्याच दिवशी 96 विनातिकीट प्रवासी, 217 अनधिकृत डब्यातून प्रवास करणारे, प्रवासी डब्यातून मालवाहतुकीची 499, अस्वच्छता पसरविणारे 29 अशा एकूण 841 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1.96 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी 183 विनातिकीट प्रवासी, 331 अनियमित डब्यातून प्रवास करणारे, प्रवासी डब्यातून मालवाहतुकीची 507 तर अस्वच्छता पसरविणारे 43 अशा एकूण 1 हजार 64 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये 2.96 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
loading image
go to top