रेल्वे तिकीट बुकींग राहणार सहा तास बंद

प्रवीण खेते
बुधवार, 2 मे 2018

ज्या प्रवाशांना बुकींग केलेले तिकीट रद्द करायचे झाल्यास, ते तिकीट या सहा तासात रद्द हाेऊ शकणार नाही.

अकाेला - आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट बुधवारी (ता. 2) रात्री 10.45 वाजतापासून सहा तासांसाठी बंद राहणार आहे. रेल्वेच्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमला (पीआरएस) अद्यावत करण्यात येणार असल्याने हे संकेतस्थळ बंद ठेवण्यात येईल. 

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बुधवारी रात्री 10.45 वाजतापासून 3 मे रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हे संकेतस्थळ बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे तिकीट बुकींग सेवा बंद राहत असल्याने रेल्वे प्रशासनाने ही वेळ निवडली आहे. परंतु, ज्या प्रवाशांना बुकींग केलेले तिकीट रद्द करायचे झाल्यास, ते तिकीट या सहा तासात रद्द हाेऊ शकणार नाही. शिवाय, रेल्वेच्या ऑनलाईन चौकशीशी संबंधित सेवाही या कालावधीत बंद असतील. बहुतांश रेल्वे प्रवाशी हल्ली आॅनलाईन माध्यमातूनच रेल्वेशी निगडीत माहिती मिळवतात. परंतु, या सहा तासांत आॅनलाईन सेवा बंद राहणार असल्याने, अशा रेल्वे प्रवाशांची पंचाईत हाेण्याची शक्यता आहे.

या माध्यमातून मिळवा माहिती  
बुधवारी रात्री 10.45 ते गुरुवारी (ता. 3) पहाटे 5 वाजताच्या कालावधीत तुम्हाला रेल्वेशी संबंधीत कुठलीही माहिती हवी असल्यास, आयव्हीआरएस टच स्क्रीन, कॉल सेंटर आणि रेल्वे फोन नंबर 139 या माध्यमातून घेता येईल. त्यामुळे प्रवाशांना तशी फार अडचण येणार नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Railway ticket booking will remain closed for six hours