esakal | रेल्वेतिकीटावरून मृत महिलेचा तपास सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रेल्वेतिकीटावरून मृत महिलेचा तपास सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वलगाव येथील सतीनगर परिसरात अकोली मार्गावर शेतात 18 ऑगस्ट रोजी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली नाही. त्या मृत महिलेजवळ रेल्वेच्या तीन तिकीट सापडल्या. त्यावरून ती अकोला किंवा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असू शकते.
संबंधित महिला अमरावती येथून अकोला येथे एकटीच गेली. परंतु अकोला येथून अमरावतीला परत येताना तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती असावा. कारण अकोला ते अमरावती रेल्वे प्रवासाच्या दोन तिकीट घटनास्थळी आढळून आल्या. शिवाय एक चाबीही होती. त्यामुळे ती एकटी कुठेतरी भाड्याने राहत असावी असाही पोलिसांचा अंदाज आहे. अमरावती शहर व ग्रामीणमधील पोलिस ठाण्यासह अकोला जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना वलगाव परिसरात आढळलेल्या मृत महिलेसंदर्भात माहिती दिली. अकोला येथून अमरावतीला येताना तिच्यासोबत कोण होते. याबाबत पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही. 1 ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीत दोन्ही जिल्ह्यांतील जेवढ्या महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहेत, त्याची पडताळणीसुद्धा पोलिसांकडून केली गेली. वलगाव पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काही मोबाईल नंबर लागले आहेत. सायबर पोलिसांकडून त्याचीही पडताळणी सुरू झाली आहे.

loading image
go to top