esakal | विदर्भवासियांनो सावधान; पाऊस पुन्हा झोडपणार
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbha rain

पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. पावसाळी वातावरणामुळे एकीकडे बळीराजावरील संकट वाढणार असून, विदर्भात हातपाय पसरवित असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विदर्भवासियांनो सावधान; पाऊस पुन्हा झोडपणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : भर उन्हाळ्यातही पाऊस परतण्याचे नावच घेत नाही आणि अधूनमधून हजेरी लावतच राहतो. गेल्या आठवड्यात दोनवेळा वादळ व गारपिटीने झोडपून काढल्यानंतर विदर्भावर पुन्हा वादळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारनंतर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, राजस्थान मधील 'वेस्टर्न डिस्टरबन्स' आणि कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या 'सायक्लॉनिक सर्क्युलेशन' मुळे छत्तीसगड, मध्यप्रदेश व विदर्भात वादळास अनुकूल स्थिती तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे शुक्रवारनंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे.

#COVID-19 आयुक्‍त तुकाराम मुंढे नेहमी एक पाऊल पुढे, हे आहे कारण....

पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. पावसाळी वातावरणामुळे एकीकडे बळीराजावरील संकट वाढणार असून, विदर्भात हातपाय पसरवित असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

loading image
go to top