Video : बहुजनांची डोके फुटू नये, म्हणून राज ठाकरे यांनी एवढे करावे ः पुरुषोत्तम खेडेकर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

राज ठाकरे यांनी व्यासपीठावर प्रथमच चार प्रतिमा ठेवल्या त्यात सावरकारांची होती. कोणत्या प्रतिमा ठेवाव्या हा त्यांचा निर्णय आहे, मात्र राज ठाकरे यांना सावरकर कोणते अभिप्रेत आहेत.

बुलडाणा : मनसेने ज्या झेंड्यावर राजमुद्रा ठेवली ते योग्य नसून राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे. निवडणूक आयोगाकडे कायदेशीर लढाई लढणार आहोत, याबाबत संभाजी ब्रिगेडने जर रस्त्यावर उतरून वेगळी भूमिका घेतली तर आम्ही सोबत असूच मात्र या दरम्यान बहुजणांनी एकमेकाची डोके फोडून घेऊ नये, राज ठाकरे यांनी राजमुद्रा हटवावी अशी सूचना वजा विनंती करतो आहे, असा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे.

तसेच राज ठाकरे यांनी व्यासपीठावर प्रथमच चार प्रतिमा ठेवल्या त्यात सावरकारांची होती. कोणत्या प्रतिमा ठेवाव्या हा त्यांचा निर्णय आहे, मात्र राज ठाकरे यांना सावरकर कोणते अभिप्रेत आहेत. 1924 पूर्वीचे की त्यानंतरचे हे अजून स्पष्ट नाही.

 

हेही वाचा - बापरे! एवढी बेरोजगारी

ठाकरे कंपनीना कोणते सावरकर अभिप्रेत आहेत हे स्पष्ट करावे
1924 पूर्वीचे सावरकर हिंदू मुसलमान एकत्र राहावे, गाय ही पशु आहे, पुरोगामी विचार मांडनारे होते अशी भूमिका तेव्हा सावरकारांची होती. मात्र, 1924 नंतरचे सावरकर हिंदू पुरस्कृत झाले तेव्हा त्यामुळे मनसे ठाकरे कंपनीना कोणते सावरकर अभिप्रेत आहेत हे स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackray should do infighting bahujan says khedekar