
चंद्रपूर : केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री असताना देशात अनेक ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र उघडले. आज (मोरवा) चंद्रपूर मध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्टच होईल, अशी अपेक्षा खासदार तथा एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केली.