

Rajmata Jijau's birthplace in Sindkhed Raja is set for a major development push. A high-level meeting chaired by CM Devendra Fadnavis is expected soon to accelerate the project.
Sakal
सिंदखेड राजा : राजमाता माँ.जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासह शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि शहराच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील जाधव यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत सांगितले आहे. ता.६ ऑगस्ट रोजी जन्मस्थळाच्या विकास आराखड्याची बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मंत्रालयीन दालनात,जिजाऊ माँ.साहेब जन्मस्थळ विकास विषयक प्राथमिक बैठक झाली.बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,आमदार मनोज कायंदे,आ.श्वेता महाले, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले,पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ऑनलाइन पद्धतीने बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण देवरे,राज्य पुरातत्व विभागाचे उपसंचालक मयुरेश खडके,सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे आदीजन उपस्थित होते.आमदार मनोज कांयदे यांनी राजमाता माँ. जिजाऊ जन्मस्थळाबद्दल सविस्तर माहिती दिली.