

महागाव (जि. यवतमाळ) : विकासाच्या नावावर नको असलेले प्रकल्प आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असतील तर असा विकास शेतकऱ्यांना नकोच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या प्रकल्पांना एकजुटीने विरोध करून हा प्रकार हाणून पाडा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.