esakal | राजुरामध्ये माझी वसुंधरा जलस्त्रोत स्वच्छता मोहीम, नगरपरिषदेकडून वर्धा नदी पात्राची स्वच्छता
sakal

बोलून बातमी शोधा

rajura corporation clean wardha river in chandrapur

गणेशोत्सव, शारदाउत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये नदीच्या पात्रात निर्माल्य विसर्जन होत असल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये  घाण पसरलेली आहे. नगर परिषद राजुरा च्या वतीने माझी वसुंधरा जलस्त्रोत स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वर्धा नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले. 

राजुरामध्ये माझी वसुंधरा जलस्त्रोत स्वच्छता मोहीम, नगरपरिषदेकडून वर्धा नदी पात्राची स्वच्छता

sakal_logo
By
आनंद चलाख

राजुरा (चंद्रपूर):  जिल्ह्यातील जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी वर्धा नदी अलीकडे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीच्या पात्रातील पाणीही प्रदूषित झालेले आहे. गणेशोत्सव, शारदाउत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये नदीच्या पात्रात निर्माल्य विसर्जन होत असल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये  घाण पसरलेली आहे. नगर परिषद राजुरा च्या वतीने माझी वसुंधरा जलस्त्रोत स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वर्धा नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले. 

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

वसुंधरा जलस्त्रोत स्वच्छता मोहीमेत मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक यांचे मार्गदर्शनात  स्वच्छता मोहीम राबविली. वर्धा नदी पात्र व परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर अभियानात विभाग प्रमुख विजय जांभुळकर, रवींद्र जामूनकर, संकेत नंदवन्शी, अक्षय सूर्यवंशी, आदित्य खापणे, सोनवणे सर, सुरेश पुणेकर, राजु लांडगे तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे  नदीपात्रातील परिसर स्वच्छ झालेला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी व पर्यावरणप्रेमींनी वर्धा नदीचे पात्र स्वच्छ करून जलस्त्रोत स्वच्छ ठेवण्याचा संदेश नागरिकांना दिला.

हेही वाचा - वाघाचे तीन अशक्त बछडे आढळले; एकाचा मृत्यू, आईचा शोध...

पाणी हे जीवन आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जल, जमीन, जंगल, हवा नैसर्गिक पर्यावरणाचे स्त्रोत आहेत. निरोगी जीवनासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे व नैसर्गिक स्त्रोत दूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जलस्त्रोत स्वच्छता अभियानात  सर्वांनी सहभागी व्हावे व पर्यावरण संवर्धनात सर्वांनी सहकार्य करावे. 
- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी,  नगर परिषद राजुरा