Farmer Killed in Hit-and-Run Accident in Rajura: राजुरा तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी संजय बोरुले यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतताना वरुर मार्गावर ही दुर्घटना घडली असून पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध तपास सुरू केला आहे.
राजुरा: शेतातील काम आटोपून घराकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याचे नाव संजय बोरुले असे आहे. ही घटना सोमवारी (ता. १) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.