

Chandrapur
esakal
जळगाव जामोद: तालुक्यातील राजूरा शिवारात अर्धवट जळालेल्या व शिरच्छेद झालेल्या महिलेच्या हत्याकांड प्रकरणाला गुरूवारी (ता.२८) नाट्यमय वळण मिळाले. ज्या युवतीचा खून झाल्याचा दावा पोलिसांनी केला ती शिवानी कळमेकर पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. दरम्यान प्रकरण अंगलट आल्यामुळे पोलिसांकडून यासंदर्भात सावधगिरी बाळगली जात असून आज एलसीबी पथकातील चौघांना बुलढाणा कंट्रोल रूमला अटॅच करण्यात आले आहे. तर अधिक तपासासाठी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी न्यायालयाने पोलिसांना परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे.