Ramdas Athawale: ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
Prakash Ambedkar: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. चंद्रपूर येथे ऐतिहासिक दीक्षाभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रपूर : रिपब्लिकन ऐक्यात सर्व गटाचे ऐक्य होत असेल तर त्यासाठी आपण चार पाऊल मागे येण्याची तयारी आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी भारतीय दलित पॅंथर संघटन मी बरखास्त केले होते. ऐक्यासाठी माझा कोणताही त्याग करण्याची तयारी राहिली आहे.