

Unconditional Love: 66-Year-Old Father Ramesh Ganthale Donates Kidney to Daughter Varsha
Sakal
कामरगाव : आयुष्याच्या कठीण वळणावर उभ्या असलेल्या मुलीला वाचवण्यासाठी एका वडिलांनी घेतलेला निर्णय आज संपूर्ण समाजाला भावूक करून गेला. वाशीम जिल्ह्यातील कामरगाव येथील वर्षा संतोष खवासे (वय ३७) यांना त्यांच्या वडिलांनी स्वतःची किडनी दान करून अक्षरशः नवजीवन दिले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.मागील काही महिन्यांपासून वर्षा या गंभीर मूत्रपिंड विकाराने त्रस्त होत्या. वाढत्या वेदना आणि सततच्या त्रासामुळे त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यांच्या उपचारासाठी डायलिसिस सुरू होते.