esakal | अखेर राणा दाम्पत्याची रात्री सुटका, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नव्याने मोर्चेबांधणी
sakal

बोलून बातमी शोधा

rana couple was released at night in amravati

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये तातडीने नुकसानभरपाई मिळावी तसेच लॉकडाउनच्या काळातील 50 टक्के वीजबिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे आंदोलन सुरू होते.

अखेर राणा दाम्पत्याची रात्री सुटका, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नव्याने मोर्चेबांधणी

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना सोमवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. सोमवारी रात्री पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यामुळे त्यांची ट्रेन चुकली असून आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर नव्याने मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - हे देवाऽऽ! मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी; सीसीटीव्हीवर झाकले होते पोते

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये तातडीने नुकसानभरपाई मिळावी तसेच लॉकडाउनच्या काळातील 50 टक्के वीजबिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे आंदोलन सुरू होते. रवी राणा यांनी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या समोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र, शासनस्तरावर कोणताच निर्णय झाला नसल्याने खासदार राणा व आमदार रवी राणा यांनी आक्रमक आंदोलनाचा निर्धार व्यक्त करीत मातोश्री गाठण्याचा निश्‍चय केला. त्या अनुषंगाने रविवारी (ता.15) सायंकाळी ते युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह विदर्भ एक्‍स्प्रेसने जाणार होते. परंतु, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून पोलिस आयुक्तालयात स्थानबद्ध केले. उशिरा रात्री त्यांची सुटका करण्यात आली. 

हेही वाचा - आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी तयार करतात सुंदर घरटं...

ताब्यात करण्याचा अधिकार नाही -
निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने ताब्यात करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. मात्र, तरीसुद्धा त्यांनी नोटीस जारी करून ताब्यात घेतले. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात निश्‍चितपणे आवाज उठविला जाईल, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले. 

हेही वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे...

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार -
खासदार नवनीत राणा या राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार करणार असून आमदार रवी राणा राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत. 

loading image