अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील वरुड व नांदगावखंडेश्वर तालुक्‍यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली.
सुनील संतलाल तुमडाम (वय 23 रा. बमनी रयत, मध्यप्रदेश) व सागर विठ्ठल कांबळे (वय 21) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीतील पीडित मुलगी (वय 11) आपली आई, भावंडासह झोपली असताना, सुनील याने घरात घुसून, मुलीला उचलून, गावातील एका म्हातारीच्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रारीवरून शेंदुरजनाघाट पोलिसांनी सुनीलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अत्याचाराची दुसरी घटना नांदगावखंडेश्वर तालुक्‍यातील एका गावात घडली. पीडित मुलगी (वय 15) घरात एकटी असताना, तेथे जाऊन सागर विठ्ठल कांबळे याने पीडितेला घराजवळच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून नांदगावखंडेश्वर पोलिसांनी सागरविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघांनाही शेंदुरजनाघाट व नांदगावखंडेश्वर पोलिसांनी शनिवारी (ता. 15) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top