वर्धा नदीत सापडली दुर्मीळ "बोद" मासोळी, मासेविक्रेत्यांमध्ये उत्साह 

नीलेश झाडे 
Wednesday, 28 October 2020

गोंडपिपरी तालुक्याला वर्धा आणि वैनगंगा नदीचे विस्तृत पात्र लाभले आहे. या नदी पात्रांनी येथील शेती समृद्ध केली. सोबतच मासेमारी करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

धाबा (जि. वर्धा) :  दुर्मीळ समजली जाणारी बोद मासोळी वर्धा नदीच्या घाटावर सापडली आहे. ही मासोळी समुद्रात आणि डॕममध्ये क्वचित सापडते. जिल्ह्यातील सकमूर घाटावर दोन किलो वजनाची बोद मासोळी प्रथमच सापडली आहे.

गोंडपिपरी तालुक्याला वर्धा आणि वैनगंगा नदीचे विस्तृत पात्र लाभले आहे. या नदी पात्रांनी येथील शेती समृद्ध केली. सोबतच मासेमारी करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला वर्धा नदीचा पात्राने विभागले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीचा पात्रात अनेक प्रजातीचा मासोळ्या, झिंगे आणि खेकडे मिळतात.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास
 

येथील नदीपात्रात मासेमारी करून अनेक कुटुंब उदरनिर्वाह करीत असतात. या नदी पात्रात तंबू, घोगूर यांसारख्या दुर्मीळ प्रजातींच्या मासोळ्या सापडत असतात. बाजारात यांना मोठी मागणी आहे. सामान्य मासोळी पेक्षा यांचे भाव दुप्पट असते.

अनेक वर्षांनंतर अतिदुर्मीळ समजली जाणारी बोद मासोळी प्रथमच सकमूर घाटावर सापडली आहे. ही मासोळी समुद्र आणि डॅममध्ये सापडत असते. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेली बोद मासोळी दोनशे किलो वजनाची होती. ही मासोळी प्रथमच गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर घाटात सापडली आहे. 

मासोळी सापडल्याने मासेमारी करणाऱ्यांमध्ये आनंद बघायला मिळाला. या मासोळीला बाजारात मोठी मागणी असून, चारशे ते सहाशे रूपये भाव मिळत असतो. सकमूर घाटावर सापडलेल्या बोद मासोळीचे वजन दोन किलो होते.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare Bod Fish found in Wardha river