श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास  

टीम ई सकाळ
Wednesday, 21 October 2020

शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली की काय अशी शंका येऊ लागते. अशावेळी आपल्यासोबत आपले कुटुंबीयसुद्धा घाबरून जातात. मात्र आता घाबरू नका. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पुढे सांगितलेले उपाय करा आणि निरोगी रहा.    

नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या समस्यांनी ग्रासले आहेत. निरोगी व्यक्तीला अगदी साधा ताप आला, श्वास घेण्यास त्रास झाला किंवा कुठलाच वास आला नाही तर ही कोरोनाची लक्षणं आहेत म्हणून ती व्यक्ती घाबरून जाते. मात्र हे लक्षणं कोरोनाची असतीलच असं नाही. मात्र अनेकांना कोरोनामुळे किंवा इतर कारणांमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली की काय अशी शंका येऊ लागते. अशावेळी आपल्यासोबत आपले कुटुंबीयसुद्धा घाबरून जातात. मात्र आता घाबरू नका. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पुढे सांगितलेले उपाय करा आणि निरोगी रहा.    

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

श्वास घेण्यास त्रास होण्याची कारणे -

व्हायरल इन्फेक्शनमुळे श्वास घेण्यास त्रास 

शरीरात ऑक्सिजनची कमी मात्रा 

कमजोर फुप्फुस असणे

घरी मेहनतीचे काम करणे 

पायऱ्या चढ- उत्तर करणे  

हे उपाय करून बघाच -

ब्लॅक कॉफी प्या:

श्वासासंबंधित काही समस्या जाणवत असेल तर कॉफी पिणे तुमच्यासाठी खूपच लाभदायी ठरू शकते. कॉफी मध्ये कैफिन असते जे आपल्या मस्तिष्काला उत्तेजित करत असते. याव्यतिरिक्त कॉफी आपल्या मसल ला रिलॅक्स देखील करत असते. श्वासासंबंधिच्या समस्या ह्या श्वासनलिकेत येणाऱ्या सुजेमुळे देखील होत असते.

अद्रकचा चहा करून पिणे:

अद्रक का मध्ये एंटी-इम्प्लिमेंट्री, एंटी-व्हायरल आणि एंटी-बॅक्टेरीयल गुण असतात, ह्या चहाचे सेवन केल्यास तुमच्या श्वासनलिकेची सूज कमी होण्यास मदत होते.

तसेच गळ्यामध्ये साचलेले सर्व कप पघळून बाहेर निघून जात असतो. यामुळे सर्दी खोकला पडसे इत्यादी आजारांवर अद्रकचा चहा खूपच उपायकारी ठरू शकतो. श्वासा संबंधित काही समस्या असल्यास तर तुम्हाला अद्रक चा चहा नक्की प्यायला हवा.

जमिनीवर झोपून मोठा श्वास घ्या:

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की आपला श्वास उखडण्याच्या मार्गावर आहे तेव्हा तुम्ही जेथे असाल तेथे लगेच जमिनीवर आडवे व्हा, आपला हात पोटावर ठेवा आणि जोरात श्वासोच्छ्वास घ्या.

श्वास घेतांना नाकाद्वारे इतक्या जास्त प्रमाणात श्वास घ्या की जेणेकरून तुमचे पोट हे मोठ्या प्रमाणात फुगेल. घेतलेला श्वास काही सेकंदासाठी तसाच ठेवा आणि नंतर आपल्या तोंडाद्वारे हा श्वास अगदी हळू हळू सोडा. हा उपाय बराच वेळ केल्यास तुम्हाला नक्की चांगले वाटेल.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

 संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know these remedies if you have problem to breath