Bhandara News : कोका अभयारण्यात पाणमांजराची नोंद

Nature Conservation : कोका अभयारण्यात चालू असलेल्या वार्षिक व्याघ्र गणनेदरम्यान दुर्मीळ युरेशियन पाणमांजराच्या जिवंत पुराव्याची नोंद कॅमेरा ट्रॅपमध्ये झाली आहे. यामुळे पाणमांजराच्या अस्तित्वावर असलेली शंका दूर झाली आहे.
Bhandara News
Bhandara Newssakal
Updated on

भंडारा : जिल्ह्यातील जंगलात युरेशियन पाणमांजराचे अस्तित्व असल्याच्या नोंदी तज्ज्ञांनी फार पूर्वीपासून केल्या आहेत. मात्र, त्याबाबत छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध नसल्याने शंका व्यक्त केली जात होती. सध्या सुरू असलेल्या वार्षिक व्याघ्र गणनेदरम्यान कोका अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मीळ पाणमांजराचा जिवंत पुरावाच उपलब्ध झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com