भाईपुर पुनर्वसनात आढळला दुर्मिळ असलेला काळडोक्या साप

राजेश सोळंकी 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

शरीराचा रंग लालसर तपकिरी शरीरावर छोट्या काळ्या ठीपक्यांची रांग डोके काळे लांब गोलाकार शरीर लांब निमूलती शेपटी असलेला. मादी साधारण पने २ ते ५ अंडी घालते या सापाचे खाद्य लहान पाली सापसुल्या आणि छोटे साप आहे.

आर्वी (जि वर्धा) - आर्वी तालुक्यातील भाईपुर येथील रहिवाशी गजानन आहाके यांच्या इथे त्यांना साप आढळून आला असता त्यांनी आर्वी येथील पीपल्स फॉर ॲनिमल्स प्राणी मित्राशी संपर्क केला. प्राणी मित्रांनी घटना स्थळ गाठून सापाची पाहणी केली. तो अत्यंत दुर्मिळ काळडोक्या जातीचा बिन विषारी साप असे आढळून आले. या सापाची सरासरी लांबी १ फुट ५ इंच आणि अधिकतम लांबी २.५ फुट असते. 

शरीराचा रंग लालसर तपकिरी शरीरावर छोट्या काळ्या ठीपक्यांची रांग डोके काळे लांब गोलाकार शरीर लांब निमूलती शेपटी असलेला. मादी साधारण पने २ ते ५ अंडी घालते या सापाचे खाद्य लहान पाली सापसुल्या आणि छोटे साप आहे. हा साप महाराष्ट्र, राजस्थान व दक्षिणेकडील सर्व राज्यात आढळतो. या सापाचे वास्तव्य दगड व ओंडक्याखाली आढळतो. जमिनीवर विशेषत पालापाचोळ्यात राहणे पसंत करतो. वैशिष्ट्ये दिनचर तसेच निशाचर आर्वी तालुक्यात पहिल्यांदा हा साप आढळला आहे. 

घटनास्थळी पिंपल्स फॉर ॲनिमलचे प्राणी मित्र मनिष ठाकरे, तुषार साबळे, गोवर्धन मेश्राम, रूपेश कैलाखे, रमन मेंढे रीतिक वडनारे, ऋतिक बोबडे, गौतम पोहने, हेमंत डोंगरे, मिलिंद मसराम, पियूष राऊत, अमन शाहू, ओम जयसिंगपुरे, हिमांशु देशमुख, तेजस खरबे, आदित्य सोरटे, प्रज्वल बानबाकोडे, आदींची उपस्थिती होती.

Web Title: A rare snake found in the Bhaipur rehab at Aarvi