esakal | अरे बापरे ! क्रिकेट खेळणाऱ्या बालकांना आढळला हा विषारी साप
sakal

बोलून बातमी शोधा

snake

तिवसा तालुक्‍यातील वरखेड (तारखेड) या गावात पोवळा जातीचा दुर्मिळ (विषारी ) साप आढळून आला. साधारण 35 सेमी 1 फूट 2 इंच लांबी असणारा हा साप काही प्रमाणातच दिसून येतो.

अरे बापरे ! क्रिकेट खेळणाऱ्या बालकांना आढळला हा विषारी साप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिवसा : साप म्हटला की अंगावर शहारा येतो आणि घाबरगुंडी उडते. बरेचदा साप बिनविषारी असतो. पण सापाविषयीची भिती जनमानसात इतकी बसली आहे की साप दिसला रे दिसला की माणसाची पाचावर धारण बसते. दिवसेंदिवस जंगले नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे वस्त्यांमध्ये या प्राण्यांचा वावर वाढतो आहे. आधी साप दिसला की घाबरून लोक त्याला मारून टाकायचे. अलिकडे मात्र सर्पमित्रांना बोलावून त्या सापांना पुन्हा जंगलात सोडण्याविषयी जागरुकता वाढते आहे.
तिवसा तालुक्‍यातील वरखेड (तारखेड) या गावात पोवळा जातीचा दुर्मिळ (विषारी ) साप आढळून आला. साधारण 35 सेमी 1 फूट 2 इंच लांबी असणारा हा साप काही प्रमाणातच दिसून येतो.
शनिवार दि. 14 रोजी सकाळी 11 च्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना रस्त्याच्या कडेला हा साप दिसून आला तेव्हा त्यांनी सर्पमित्राला संपर्क करून माहिती दिली. सर्पमित्र सागर नांदणे,राहुल नेवारे, यांनी सापाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. यावेळी सर्पमित्रासह गावातील लोकांनी साप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

सविस्तर वाचा - अरे बापरे! संशयितांचा उपचार करताना डॉक्‍टरालाच लागण झाल्याचा संशय
सापाचे वैशिष्ट्य
नाव- पोवळा (विषारी )
पश्‍चिम महाराष्ट्र , गुजरात, बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात आढळून येतो
रंग व आकार - तपकिरी डोके व मान फिकट, लहान शेपटी दोन काळे पट्टे. पोटाकडील भाग लाल, शेपटी खाली निळा किंवा काळा रंग, डोळे लहान व काळे, लांबट सडपातळ शरीर, मऊ खवले.
हा साप वाळलेल्या पानांखाली किंवा दगडांच्या सामटीत दिसून येतो. हा दुर्मिळ साप निशाचर आहे चिडल्यावर शेपटी वर करून खवल्यांचा रंग ही प्रदर्शित करतो.