Yavatmal News : ‘रताळा’ने ओलाडंल्या राज्याच्या सीमा; पुणे, मुंबईनंतर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातही ‘रताळा’चा पुरवठा

महाशिवरात्रीला विदर्भातील सर्वाधिक फराळाचा मेन्यू म्हणजे रताळे.
Ratala
Ratalasakal
Updated on

यवतमाळ - महाशिवरात्रीला विदर्भातील सर्वाधिक फराळाचा मेन्यू म्हणजे रताळे. हा मेन्यू जिल्हा, विदर्भात मर्यादित न राहात आता राज्याच्या सीमा ओलाडंल्या आहे. पुणे, मुंबईनंतर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातही ‘रताळा’चा पुरवठा झाला आहे. केवळ, महाशिवरात्रीसाठीच हे पीक घेतले जाते. यंदा जवळपास 200 हेक्टरवर लागवड झाली हे विशेष.

हल्ली उपवासाच्या फराळात अनेक नवनवे मेन्यू दाखल झाले आहेत. असे असले तरी तेलकट पदार्थ कमी वापरले जात आहेत. फळांचे सेवण, ज्यूस आदींच्या सेवणांचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांत मागणीचा पदार्थ म्हणून रताळांना गेल्या काही वर्षांत मागणी वाढली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातही रताळू पोहोचले आहे.

महाशिवरात्रीच्या काही दिवसांपूर्वी रताळे बाजारात येण्यास सुरुवात होते. वर्षातून याच कालावधीत रताळे उपलब्ध होतात. त्यामुळे उपवास असो किंवा नसो सर्वांकडून रताळांची मागणी असते. लाडखेडला रताळांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

दारव्हा तालुक्यातील लाडखेड हे गाव ‘नागवेलीच्या पानाची’ शेती आणि व्यवसाय करणारे गाव म्हणून ओळखले जाते. गावात बारी समाजबांधव मोठ्या प्रमाणात असून त्यांचा हा प्रमुख व्यवसाय. पिढ्यान्पिढ्या शेतकर्‍यांनी ‘पाना’ची शेती केली.

बदलत्या वातारवणामुळे ‘पानतांडे’ नामशेष झाले. यानंतर शेतकर्‍यांनी रताळाची शेती सुरू केली. गेल्या 50 वर्षांपासून रताळांची शेती केली जाते. यंदाही महाशिवरात्रीच्या पूर्वीच विदर्भासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातही रताळे पोहोचले असून नागरिकांना रताळांची चव मिळाली आहे.

चार महिन्यांचे पीक

रताळाची शेती चार ते पाच महिन्यांची आहे. शेतकरी परिश्रम घेऊन पिके घेतात. यंदा 200 हेक्टरवर लागवड करण्यात आली असून जवळपास 150 टन रताळांचे उत्पादन केले जाते. मागणी असतानाही बाजार भाव मिळत नसल्याची खंत रताळ उत्पादक शेतकर्‍यांना आहे.

परंपरा जपली

पूर्वापारपासून लाडखेड येथे रताळाची लागवड केली जाते. आम्ही ती परंपरा कायम ठेवली आहे. महाशिवरात्रीच्या काळात जवळपास 150 टन माल जातो. 15 ते 20 रुपये किलो ठोक बाजारात दर मिळत असल्याचे श्रीराम टाके, देवराव दुधे, शुभम निमकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com