पाकला चोख उत्तर देऊ रविशंकर प्रसाद यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 August 2019

नागपूर : काश्‍मीरचे विशेषाधिकार काढल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रोज नवे वक्तव्य करून चिथावणीची भाषा वापरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, जर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून कुठलीही कारवाई झाली तर त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण (नासला) यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित सतराव्या अखिल भारतीय संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर रविशंकर प्रसाद पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर : काश्‍मीरचे विशेषाधिकार काढल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रोज नवे वक्तव्य करून चिथावणीची भाषा वापरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, जर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून कुठलीही कारवाई झाली तर त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण (नासला) यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित सतराव्या अखिल भारतीय संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर रविशंकर प्रसाद पत्रकारांशी बोलत होते. जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय तेथील जनतेसाठी आणि देशहितासाठी घेण्यात आला असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाही. यापूर्वी तिथे अनेक महत्त्वाचे कायदे लागू होत नव्हते. ते आता लागू होतील. त्यामुळे जम्मू-काश्‍मिरातील परिस्थिती सुधारेल. इतकेच नव्हे, तर दहशतवाद संपण्यासही मदत होणार असल्याचा विश्‍वास रविशंकर प्रसाद यांनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shankar Prasad warns Pak to give a quick answer