यशोगाथा : शेतीला आधुनिकतेची सांगड घालत घेतले ४५ क्विंटल कारल्याचे उत्पादन

सुधाकर दुधे
Friday, 2 October 2020

ड्रीप पद्धतीने अर्ध्या एकरात तार, बांबू यांच्या साहाय्याने मांडव तयार करून त्यांनी कारल्याचे पीक घेतले. तालुका कृषी अधिकारी ढवळे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी उमेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारल्याची लागवड केली.

सावली (जि. चंद्रपूर) : आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतीची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. मात्र, याही परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतीला आधुनिकतेची सांगड देत आहे. तालुक्‍यातील भट्टीजांब येथे शेतकरी हरिदास बुधाजी मेश्राम यांनी शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली. आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी कारल्याचे विक्रमी उत्पादन घेतले.

सावली तालुक्‍यातील प्रगतशील शेतकरी हरिदास मेश्राम हे दरवर्षी नवनवीन पद्धतीने विविध पिकाची लागवड करतात. सोयाबीन, कापूस, तूर, धान यासह हळद, टमाटर, वांगे हा भाजीपाला नेहमी घेतात. यंदा त्यांनी कारले घेतले. आधुनिक पद्धतीचा अवलंब करून कारल्याची लागवड केली. त्यांना कारल्यातून १ लाख ३० हजार रुपयाचे विक्रमी उत्पादन मिळाले.

त्यांना लागवडीचा व इतर खर्च २२ हजार रुपये आला. १ लाख ८० हजार रुपये नफा मिळाला. ड्रीप पद्धतीने अर्ध्या एकरात तार, बांबू यांच्या साहाय्याने मांडव तयार करून त्यांनी कारल्याचे पीक घेतले. तालुका कृषी अधिकारी ढवळे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी उमेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारल्याची लागवड केली.

अधिक वाचा - आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा

वेलवर्गीय पीक घेतले
चंद्रपूर-गडचिरोली उत्पादन कंपनी शाखा सावलीच्या मादतीने नाशिक येथे अभ्यास दौरा केला. तेथील लागवड पद्धत आणि तोच पॅटर्न आपल्या शेतात राबविला. वेलवर्गीय पीक घेतल्याने आजपर्यंत ४५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले आहे.
- हरीदास मेश्राम,
प्रगतशील शेतकरी, भट्टीजांब.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record production of carle in half an acre