
गडचिरोली : भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ जुलैकरिता ऑरेंज अलर्ट आणि २५ जुलैकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसेच २५ जुलै रोजी अत्याधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २४ जुलै रोजी जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.