esakal | ‘वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन’
sakal

बोलून बातमी शोधा

‘वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन’

‘वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी वंचित बहुजन आघाडीचा आग्रह आहे. शिवाय ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीदेखील पक्षाची भूमिका आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले. (Rekha-Thakur-Deprived-Bahujan-Front-Muslim-OBC-reservation-Yavatmal-District-nad86)

यवतमाळ जिल्ह्यात आढावा बैठकीसाठी आल्या असता त्यांनी दै. ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात सोमवारी (ता. 19) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या माध्ममातून पक्ष संघटन, समीक्षा, समन्वय साधल्या जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले. आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वंचित समुहातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्ममातून संधी देण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

कार्यकर्त्यांनाही संधी मिळेल. त्यातच कार्यकर्त्यांनी पसंती दर्शविलेल्या उमेदवारांना दरवाजे उघडे राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ताकद दाखविली आहे. २०२४ च्या निवडणुकीची तयारी म्हणून जिल्हा कार्यकारिणीला अधिक बळकट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

(Rekha-Thakur-Deprived-Bahujan-Front-Muslim-OBC-reservation-Yavatmal-District-nad86)

loading image