esakal | हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले ‘हे’ संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : पावसाने चार ते पाच वर्षांची अनियमिततेची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूचे आगमन झाले असले तरी, पावसाचा जोर नसल्याने जिल्ह्यात अजूनपर्यंत सरासरी पर्जन्यमान गाठले नाही. दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पावसाने सुरुवात केली असून, आर्द्रताही वाढली आहे. परंतु, अजूनही पावसाची अनियमितता कायम राहणार आहे. पुढच्या आठवड्यात तुरळक व मध्यम पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. (Rain-News-Irregularity-of-rainfall-Signs-of-sparse-and-moderate-rainfall-Akola-district-rain-news-nad86)

यावर्षी योग्यवेळी मॉन्सूनचे आगमन व सामान्य पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन झालेही परंतु, तुरळक हजेरीनंतर पावसाने दांडी मारली. स्थानिक हवामान बदलानुसार काही भागात पाऊस पडला. मात्र, खरिपासाठी पुरक पावसाची शेतकऱ्याना अजूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

गत आठवड्यातही मॉन्सूनने लहरिपणाचा अनुभव दिला. कमी दाबचे क्षेत्र गुजरात किनारपट्टी जवळ स्थिर असल्याने, राज्यात सर्वत्र स्थानिक स्वरूपात तुरळक पावसाची उपस्थिती राहाली. सर्व जिल्ह्यात तापमान वाढलेले आणि वातावरण दमट होते. मॉन्सूनचा जास्त पाऊस अरबी समुद्रावर बरसत राहिला. यापुढेही काही दिवस पावसाची अनियमितता राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आजच्या उपग्रह छायाचित्रनुसार मॉन्सून मध्य प्रदेश, छतीसगड, बिहार, झारखंड आणि लगतच्या राज्यात पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात खांदेश, वऱ्हाड, आणि पूर्व विदर्भात तुरळक ते मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होण्याचे अनुमान असून, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, गोंदिया, उत्तर गडचिरोली सोबत नगर, औरंगाबाद, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि तेलंगाणा सीमा परिसरात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मात्र, येणाऱ्या आठवड्यात सुद्धा अनियमित पाऊस बरसण्याचे अनुमान.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस

गेल्यावर्षी १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५९ मिमी पाऊस पडला होता. यावर्षी मात्र, त्या तुलनेत केवळ १२१.४ म्हणजे निम्म्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक तेल्हारा तालुक्यात १६१.८ मिमी पाऊस पडला तर, सर्वात कमी अकोट तालुक्यात ९६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

(Rain-News-Irregularity-of-rainfall-Signs-of-sparse-and-moderate-rainfall-Akola-district-rain-news-nad86)

loading image