esakal | यवतमाळमधील खासगी कोविड हॉस्पिटलची तोडफोड; हलगर्जीपणाचा आरोप करीत नातेवाईक संतप्त

बोलून बातमी शोधा

null

यवतमाळमधील खासगी कोविड हॉस्पिटलची तोडफोड; हलगर्जीपणाचा आरोप करीत नातेवाईक संतप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील कोविड डेडिकेटेड डॉ. महेश शाह यांच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (ता.28) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

कविता धनराज चव्हाण असे मृत रुग्णाचे नाव आहे. ही महिला कोरोनाबाधित असल्याने उपचारासाठी डॉ. शहा यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले होते. ती घाटंजी तालुक्‍यातील शिवणी येथील रहिवासी होती. रुग्णालयात प्रकृती चिंताजनक होती. यातच उपचारादरम्यान रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्‍सिजन मास्क काढल्याने मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. तर कविताची ऑक्‍सिजन लेवल कमी झाल्याने सी पॅप काढून व्हेंटिलेटर लावत असताना मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट; नातेवाईकांची तक्रार, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

संतप्त नातेवाइकांनी टीव्ही, संगणक, दरवाजाच्या काचा फोडून आदी अन्य साहित्याचे नुकसान केले आहे. त्यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रात्री रुग्ण नातेवाइक आणि डॉक्‍टरांनी पोलिसांत तक्रार देण्याची तयारी चालविली होती. मात्र, वृत्तलिहेस्तोवर पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती.

संपादन - अथर्व महांकाळ