esakal | मुलांमुळे आई-वडिलांना अनुभवता आला विवाह सोहळा; आयुष्याच्या सायंकाळी दाम्पत्य चढले बोहल्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Remarriage of parents due to children in Yavatmal district

हिवराळे दाम्पत्याला तीन मुले आहेत. मोठी मुलगी तुळजा जोगदंड (रा. सायखेडा ता. दारव्हा), दुसरा मुलगा पुंडलिक तर, तिसरा मुलगा पंडित आहे. हिवराळे कुटुंबीयांनी आपल्या आई-वडिलांचे लग्न बालवयात झाल्याने त्यांना विवाह झाल्याचे आठवत नाही.

मुलांमुळे आई-वडिलांना अनुभवता आला विवाह सोहळा; आयुष्याच्या सायंकाळी दाम्पत्य चढले बोहल्यावर

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : विवाह सोहळा हा आयुष्यातील आनंदाचा क्षण. मात्र, पूर्वी बालवयातच विवाह होत असल्याने या आनंदाच्या क्षणापासून अनेकांना वंचित रहावे लागत होते. आपल्या विवाहाच्या आठवणीही त्यांच्या स्मरणात नाही. तालुक्‍यातील लोणी येथील हिवराळे दाम्पत्याला मुलांनी आयुष्याच्या सायंकाळी बोहल्यावर चढविले. सोमवारी (ता. १६) त्यांना पुन्हा आपल्या विवाहाचा सोहळा अनुभवता आला.

लोणी येथील सीताराम उंद्राजी हिवराळे यांचा खंडाळा येथील निर्मला सूर्यभान इंगोले यांच्यासोबत १६ नोव्हेंबर १९५५ साली विवाह झाला होता. त्यावेळी सीताराम यांचे वय १२ वर्षे तर निर्मला यांचे वय अवघे सात वर्षे होते. बालपणी झालेल्या विवाहाची आठवण या दाम्पत्याला नाही. त्यामुळे मुलांनीच आई-वडिलांचा विवाह सोहळा आयोजित केला.

अधिक माहितीसाठी - नागपुरात शहरात पुन्हा गॅंगवॉर भडकले; विजू मोहोड हत्याकांडाचा घेतला बदला

हिवराळे दाम्पत्याला तीन मुले आहेत. मोठी मुलगी तुळजा जोगदंड (रा. सायखेडा ता. दारव्हा), दुसरा मुलगा पुंडलिक तर, तिसरा मुलगा पंडित आहे. हिवराळे कुटुंबीयांनी आपल्या आई-वडिलांचे लग्न बालवयात झाल्याने त्यांना विवाह झाल्याचे आठवत नाही.

त्यामुळे सीताराम हिवराळे (वय ८५) व निर्मला हिवराळे (वय ७२) यांचा विवाह ६५ वर्षांनंतर पुन्हा एकदा झाला. नवरदेवाचे पालक मोठा मुलगा पुंडलिक हिवराळे तर, लहान मुलगा पंडित नवरीचा पालक झाला. यावेळी नातेवाइकांसह कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित होते.

जाणून घ्या - Video : जनावरांना बिल्ला लावल्यास तातडीने मिळणार नुकसान भरपाई; हेही आहेत फायदे

दोघांनाही लागली हळद

रितीरिवाजानुसार दोघांनी रविवारी (ता. १५) हळद लावण्यात आली. सोमवारी फटाक्‍यांची आतषबाजी करीत कार हनुमान मंदिराच्या पारावर नेण्यात आली. लग्नमंडपी नवरी व नवदेवाचा शुभमंगल सावधानने पुनर्विवाह सोहळा रंगला. वरातीसाठी जेवणाचे आयोजनही करण्यात आले होते. लग्नघरी जी धामधूम आणि उत्साह असतो, तो येथेही बघावयास मिळाला.

संपादन - नीलेश डाखोरे