esakal | नागपुरात शहरात पुन्हा गॅंगवॉर भडकले; विजू मोहोड हत्याकांडाचा घेतला बदला
sakal

बोलून बातमी शोधा

Gangwar in Nagpur again

कुख्यात जुगार माफिया विजू मोहोड हत्याकांडाचा बदला म्हणून त्याच्या तीन साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांना संपविले. कुणाल सुरेश चरडे (२९, रा. नरसाळा) सुशील बावने (वय २५, रा. राऊत नगर, दिघोरी) असे खून झालेल्या गुंडांची नावे आहेत.

नागपुरात शहरात पुन्हा गॅंगवॉर भडकले; विजू मोहोड हत्याकांडाचा घेतला बदला

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः शहरातील गॅंगवॉर पुन्हा भडकले असून दोन गुंडाचे प्रतिस्पर्धी टोळीने अपहरण करून फिल्मी स्टाईलने चाकू-तलवारीने भोसकून निर्घृण खून केला.  ही हत्येची खळबळजनक घटना सोमवारी सकाळच्या सुमारास पाचगाव कुही रोड, डोंगरगाव जवळ घडकीस आली. 

सविस्तर वाचा - 'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय, दिवाळीच्या दिवशी ऑर्डर मिळताच पोटभरून जेवलो'

कुख्यात जुगार माफिया विजू मोहोड हत्याकांडाचा बदला म्हणून त्याच्या तीन साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांना संपविले. कुणाल सुरेश चरडे (२९, रा. नरसाळा) सुशील बावने (वय २५, रा. राऊत नगर, दिघोरी) असे खून झालेल्या गुंडांची नावे आहेत. या हत्याकांडात ग्रामिण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. जुगार माफिया विजू मोहोड हत्याकांडाचा बदल्यातून ही घटना घडल्याचे बोलले जाते. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तर ग्रामीण एलसीबी पथकाचे प्रमुख अनिल जिट्टेवार यांच्या नेतृत्वातील पथकाने अथक परिश्रम घेऊन अवघ्या काही तासातच हत्येचा पर्दाफाश केला. 

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. धारदार शस्त्र व सिमेंटचा खांबने मारून जागीच ठार केले. अपहरणासाठी कारचा वापर केल्याचे तपासात समोर आहे. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे..

संपादन - अथर्व महांकाळ