पत्रकाचा निषेध करणारे काढले पत्रक; भाजपमध्ये कलह

सतीश घारड
शनिवार, 7 डिसेंबर 2019

भाजपमधील अंतर्गत कलह त्यामुळे चव्हाट्यावर आला होता. पत्रकात चार जणांचे फोटो होते, त्यापैकी दोघांनी खंडन करण्यासाठी पत्रकांचे वाटप केले आहे. टेकाडीमधून उमेदवारी कुणाला, याची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

टेकाडी (जि.नागपूर) : स्थानिक "लाओ गाव बचावो' असा संदेश असलेले पत्रक टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये वाटप करण्यात आले होते. भाजपमधील अंतर्गत कलह त्यामुळे चव्हाट्यावर आला होता. पत्रकात चार जणांचे फोटो होते, त्यापैकी दोघांनी खंडन करण्यासाठी पत्रकांचे वाटप केले आहे. टेकाडीमधून उमेदवारी कुणाला, याची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

"स्थानीक उमेदवार, आमचा हक्‍क'
जिल्हा परिषद सर्कलमधून कॉंग्रेसच्या रश्‍मी श्‍यामकुमार बर्वे, शिवसेनेकडून वैशाली ईश्‍वरदास पाल (गणेर), राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्या गणेश पानतावणे तर भाजपकडून कल्पना शंकर चहांदे उमेदवार निश्‍चित झाले असल्याची चर्चा असून उमेदवारांच्या मतदारांसोबत भेटीगाठी देखील सुरू झालेल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी इथली लढत संघर्षाची मानली जात आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानीय चार भाजप पदाधिकाऱ्यांनी "स्थानीय उमेदवार, आमचा हक्क', "उमेदवार हवा पार्सल नको' असे पत्रक वर्तमानपत्रात टाकले. त्यावर शालिनी लीलाधर बर्वे, इंदिरा किशोर मनपिया, प्रियंका धर्मेंद्र गणवीर आणि महत्वाचं म्हणजे यात टेकाडी ग्रामपंचायत सरपंच सुनीता पृथ्वीराज मेश्राम यांचा फोटो होता. स्थानिक उमेदवार नसेल तर कुठल्याही पक्षाच्या स्थानिक उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन यातून करण्यात आले होते.

शुक्रवारी सकाळी या चार इच्छुकांपैकी इंदिरा किशोर मनपिया व प्रियंका धर्मेंद्र गणवीर या दोघींनी त्या पत्रकाशी कसलाही संबध नाही. अज्ञात समाजकंटकांनी असे केले आहे, असा उल्लेख करत निषेध नोंदवून खंडन केले. हे पत्रक लोकांच्या हाती पडताच दोन विरोधक चहांदे यांनी शांत केल्याची चर्चा जोमात आहे. परंतु दोन्ही इच्छुकांची पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढण्याची इच्छा मात्र प्रबळ आहे. ज्यामुळे चहांदे यांच्या पदरात पडणारी उमेदवारी अद्यापही अधांतरावर मानली जात आहे.

भाजपसाठी आंतरिक कलह
विधानसभा निवडणुकीत डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी न देण्याबाबत अनेक शर्थीचे प्रयत्न पक्षांतर्गत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते. परंतु उमेदवारी रेड्डी यांनाच झाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार आशीष जयस्वाल यांच्या समर्थनार्थ काम केल्याचे शीत युद्ध अजूनही भाजपच्या खेम्यात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही इच्छुकांना डावलले गेल्याने तीच भीती भाजपमध्ये दिसून येणार का? असाही प्रश्‍न या निमित्ताने सुरू झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removed sheet deflecting sheet; The strife in the BJP