Gadchiroli Child Labor : गडचिरोलीत चार बालकामगारांची सुटका; संयुक्त धाडसत्र यशस्वी
Gadchiroli News : गडचिरोलीमध्ये सरकारी अधिकारी व स्पर्श संस्थेच्या संयुक्त धाडसत्रात चार बालकामगारांना मुक्त करण्यात आले. पालकांकडे सोपवताना कामावर न ठेवण्याचे हमीपत्रही घेतले गेले.
गडचिरोली : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आणि ‘स्पर्श’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या संयुक्त अभियानात गडचिरोली शहरातील चार बालकामगारांची सुटका करण्यात आली.