Maharashtra Rain : मेहकर-लोणार तालुक्यात ढगफुटी पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोणगाव येथील पाच जण कास नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकले आहेत आणि त्यांचे बचावकार्य सुरू आहे.
डोणगाव : मेहकर-लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच डोणगाव येथील पाच जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे.