अरे वा! गावाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

कोरोनाचा फैलाव रोखणे हा सर्वांसमोर महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे. बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दररोज वाढ होत आहे.
 

धामणगाव बढे (जि.बुलडाणा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचा मोठा मार्ग म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविणे. आयुष्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरणाचा निर्णय सिंदखेड ग्रामपंचायतीने घेतला आहे. असा निर्णय घेणारी राज्यातील ही पहिली ग्रामपंचायत असल्याचे सरपंच विमल कदम यांनी सांगितले.

कोरोनाचा फैलाव रोखणे हा सर्वांसमोर महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे. बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आर्सेनिक अल्बम 30 हे औषध देण्याचा निर्णय घेतला.

या औषधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्याने प्रतिबंधात्मक घटक म्हणून हा चांगला पर्याय असल्याचे आयुष मंत्रालयाने ही सांगितले आहे. गावातील दोन हजार 600 लोकांना लोकवर्गणीच्या माध्यमातून या औषधीचे वाटप करण्यात येत आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी हे औषध असून दररोज सकाळी चार गोळ्या तीन दिवस घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

हेही वाचा - अरे वा! एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला 'टाईमटेबल'

सरपंच विमल कदम, उपसरपंच अशोक माळेकर ,सचिव राजेंद्र वैराळकर , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव, राजू भुसारी, शुभांगी मोरे, यांच्यासह अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती चे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सिंदखेड लपाली गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासनामार्फत गेल्या आठवड्यात घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल टेस्टिंग करण्यात आले.

आवश्यक वाचा - धक्कादायक! मस्तवाल वाळू माफियाची मुजोरी; तहसीलदारांना शर्ट फाडून मारहाण

आवश्यकतेनुसार गावकर्‍यांची काळजी घेतली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन, स्वयंसेवक, बचत गट, महिला, ग्राम संरक्षण समिती हे सर्व मिळून या संकटकाळात एकजुटीने कार्यरत आहेत. त्यामुळेच आपण पहिला मान मिळू शकला असे सरपंच श्रीमती कदम यांनी सकाळ’शी बोलताना सांगितले. 

आदर्श उपाययोजना
सिंदखेड मध्ये बाहेरगावाहून आलेल्यांना गावाबाहेरील पाणी फाउंडेशन प्रशिक्षण केंद्र व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विलगीकरण लक्षात ठेवले जाते. या ग्रामपातळीवरील लढाईसाठी गावातील युवकांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर सुमारे एक लाखांची वर्गणी गोळा केली असून त्यातून आजवर मास्क, नॉन काँटॅक्ट थरमोमीटर, ऑक्सी मिटर, आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या आदी खरेदी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolution of Sindkhed Lapali Gram Panchayat for village immunity in buldana district