'थर्टीफस्ट'ला रात्रभर म्हणा, झुमऽऽऽ झुमऽऽऽ झुमऽऽऽ बाबा

thirty first
thirty first

अमरावती : थर्टीफस्टच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना, कुठे जावे, याची चिंता करण्याची गरज नाही. कारण पहाटे पाच वाजेपर्यंत परमीट रुम, शाकाहारी हॉटेल, रेस्टारंटसह ऑर्केस्ट्रा, बार, हॉटेल्स सुरू राहणार आहेत. सरकारने परवानगी दिली असली तरी पोलिस रस्त्यावर राहणार असल्याने तळीराम किती जोर मारतात हे थर्टीफस्टच्या रात्रीच कळणार आहे.

नवीनवर्षाचे स्वागत करताना काही उत्साही मद्यप्राशन करून सर्वसामान्यांना वेठीस धरतात, भरधाव वाहने चालवून अपघात घडतात. अनेक ठिकाणी सामान्य व्यक्तींचा त्याचा फटका बसतो. बरेच ठिकाणी निवासी क्षेत्रात महिला, युवतींची छेडखानीच्याही घटना घडतात. असा आजपर्यंतच अनुभव आहे. त्यामुळे 2020 या नवीनवर्षाचे स्वागत करीत असतानाच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे व शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये पोलिस तैनात राहतील.

पहाटे पाचपर्यंत तळीरामांना मुभा
शिवाय मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रिथ ऍनालायजरने वाहतूक पोलिसांकडून तपासणी केल्या जाईल. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्याची तयारी आहे. त्यामुळे एकीकडे मद्यप्राशन करण्यासाठी शासनाने दिलेली परवानगी आणि दुसरीकडे रस्त्यावर पोलिसांकडून होणारी कारवाई या कचाट्यातून उत्साही लोक कशी सुटका करून घेतात हे थर्टीफस्टच्या रात्री लक्षात येईल.

सरकारची परवानगी, मात्र पोलिस रस्त्यावर
ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे आणि काही हॉटेल्सवरही यादिवशी पोलिसांची नजर असेल. एरवी परमीट रुमला रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची परवानगी आहे. परंतु थर्टीफस्टसाठी ही प्रतिष्ठाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने या एकाच दिवसात लाखो रुपयांचा निधी (कर) स्वरूपात शासनाच्या तिजोरीत मद्यविक्रीतून जमा होणार आहे. त्यामुळे स्वागताच्या नावाने धुमाकूळ घालणाऱ्यांवर पूर्णपणे अंकुश पोलिसांना लावता येईल किंवा नाही याबाबत शंका घेतल्या जात आहे.

व्यावसायिक सज्ज
थर्टीफस्टचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत. विविध हॉटेलमध्ये स्कीम येण्याची शक्‍यतासुद्धा आहे. त्यामुळे शौकिनांची अशा हॉटेलमध्ये जास्त गर्दी राहण्याची शक्‍यता आहे.

उत्पादनशुल्क विभाग सतर्क
थर्टिफस्टला जिल्ह्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात बनावट मद्याची विक्री होण्याचे संकेत आहेत. ही शक्‍यता लक्षात घेता राज्य उत्पादनशुल्क विभागाने विविध पथके गठित करून अचानक तपासणीचा बेत आखला आहे. अर्थात या तपासणीत किती कारवाई करण्यात येते हे 31 डिसेंबरलाच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com