esakal | महाविद्यालयात नेमता येणार सेवानिवृत्त शिक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयात नेमता येणार सेवानिवृत्त शिक्षक

महाविद्यालयात नेमता येणार सेवानिवृत्त शिक्षक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयांत विनाअनुदानित अभ्यासक्रमांना नियमित प्राध्यापक नसल्याचे दिसून येते. यासंदर्भातील नुकत्याच झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत विनाअनुदानित महाविद्यालयात रिक्त जागांवर सेवानिवृत्त प्राध्यापकांची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यूजीसीने प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे केले. राज्य सरकारनेही त्यात बदल करून 60 वरून 65 वर्षे सेवानिवृत्तीचे वय केले. मात्र, काहीच दिवसांत राज्य सरकारने काही कारणे देत, पुन्हा नवीन अध्यादेश काढून प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वरून 60 वर्षे केले. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर अनुदानित महाविद्यालयांना प्राध्यापक भरतीसाठी मान्यता घेणे आवश्‍यक आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांना अशी अट नसल्याने त्यांना प्राध्यापकांची नेमणूक करता येणे सहज शक्‍य होते. मात्र, या पदावर प्राध्यापकांची नेमणूक करताना पात्र व्यक्ती मिळत नसल्याची ओरड महाविद्यालयांकडून वारंवार होताना दिसून येते. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी नियमित प्राध्यापकांची नेमणूक केलेली नाही.
loading image
go to top