Digital Arrest Scam: सेवानिवृत्त न्यायाधीश डिजिटल अरेस्ट; ३१ लाखांनी सायबर गुन्हेगारांनी लुबाडले, तक्रार दाखल
Cyber Fraud : अमरावतीत निवृत्त न्यायाधीशांना तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी फसवत ३१ लाख रुपयांनी लुबाडले. ‘डिजिटल अरेस्ट’च्या या प्रकरणामुळे सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.
अमरावती : शहरात सेवानिवृत्त व वृद्धांना हेरून डिजिटल अरेस्ट केल्या जात असल्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. बुधवारी (ता. आठ) पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला. सेवानिवृत्त न्यायाधीश यांना तोतयांनी ३१ लाख रुपयांनी लुबाडले.