Illegal Sand Mining : परसवाडा मंडळांतर्गत अर्जुनी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसण्याच्या घटनेत ८ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. महसूल विभागाने ही कारवाई नायब तहसीलदार ए. पी. मोहनकर यांच्या नेतृत्वाखाली केली असून, भविष्यात कारवाई अधिक तीव्र केली जाईल.
तिरोडा ( जि. गोंदिया) : परसवाडा मंडळांतर्गत येणाऱ्या अर्जुनी येथील वैनगंगा नदी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने तत्काळ कारवाई करत ८ ट्रॅक्टर जप्त केले आहेत.