Climate Changesakal
विदर्भ
Climate Change : उघड्या जमिनीमुळे तापतोय विदर्भ! ओसाड शेत बनली तापमान वृद्धीचे खरे कारण,सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस
Rising Temperatures: विदर्भातील ओसाड जमीन आणि नष्ट होणारी जंगले तापमान वाढीस कारणीभूत ठरत असून, अकोला, नागपूर, चंद्रपूर येथे उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे.
अकोला : वऱ्हाडासह विदर्भात उन्हाळी पिके लुप्त होत आहेत. तसेच जंगलही नष्ट होत आहेत. त्यामुळे सध्या परिसरात बहुतांश जंगले व शेते उघडी पडली असून, दरवर्षीच या दिवसांत जमीन ओसाड पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच राज्यात नव्हे तर, जगभरात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात आणि त्यातही प्रामुख्याने अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव खान्देश या जिल्ह्यांमध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे.

