Video : काय म्हणता! पक्षांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण रस्ते अपघात? संशोधनाचा निष्कर्ष

bird
bird

अमरावती :जीवो जीवस्य जीवनम हेच निसर्गाचे सूत्र आहे. जीवनाच्या या साखळीतील एक जरी कडी निखळली तरी सगळा संसारच अडचणीत येईल. म्हणूनच इथल्या प्रत्येकच जीवाचे संरक्षण महत्त्वाचे आहे.  विविध कारणांमुळे पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याची माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली आहे. रस्ते अपघात हे त्यातले मुख्य कारण आहे.

लाॅकडाऊनमुळे ही संख्या एकदमच कमी झाल्याचे आकडेवारी वरून पुढे आले आहे. लाॅकडाऊन पूर्वीचे जे प्रमाण हाेते, ते लाॅकडाऊनमध्ये एकदमच कमी झाले आहे.  रस्ते अपघातात हजारो पक्षी मृत्युमुखी पडत असून भारद्वाज, ठीपकेवाला पिंगळा, रातवा, सातभाई या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

रस्ते अपघातात वन्यप्राणी आणि पक्षी सुद्धा सुटलेले नाहीत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या, भरधाव वेग व एल.इ.डी लाईट पक्ष्यांच्या काही प्रजातींच्या मुळावर उठले आहेत. असा अहवाल नुकताच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून  प्राणीशास्त्र विषयात आचार्य  पदवी मिळवलेले अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालयातील  प्राणीशास्त्र विभाग प्रमुख अमोल रावणकर यांच्या संशोधनातून पुढे आला आहे.

प्रा. अमोल रावणकर यांनी “Evaluation of Avian Carcasses from Amravati District and their Molecular Systematic (अमरावती जिल्ह्यात म्रुत्युमुखी पडणारे विविध प्रजातींचे पक्षी आणि त्या मागील कारणांचा शोध तसेच त्यांचा जनुकीय अभ्यास)” या विषयावर  संशोधन केलेले आहे. या संशोधनासाठी त्यांना अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व पक्षी अभ्यासक डॉ. गजानन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

ही आहेत कारणे
जिल्ह्यात मृत्युमुखी पडणारे विविध प्रजातींचे पक्षी व त्याची कारणे यावर मागील तीन वर्षात केलेल्या अभ्यासातून निरनिराळे १३ प्रकारचे धाेके पुढे आले आहे.
रस्ता अपघात, पक्ष्यांची शिकार व विक्री, उच्च दाबाच्या विद्युत तारांचा संपर्क, विषमिश्रित अन्न व पाणी पिल्याने, अवकाळी वादळी-पाऊस आणि गारपीट, मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून मृत्यू पतंगी साठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांज्यामुळे मृत्यू शेतामध्ये वापरण्यात येत असलेल्या कीटक नाशकामुळे मृत्यू पिक रक्षणासाठी गावातील लोकांकडून मारले जाऊन होणारा मृत्यू उन्हाळयातील तापमानामुळे होणारा मृत्यू, इमारतीवरील काचांवर आदळून होणारा मृत्यू, प्राणी व शिकारी पक्षी यांचे कडून मारले जाऊन होणारे मृत्यू तसेच अन्नपाणी न मिळणे व आजार यामुळे होणारे मृत्यू, असे एकूण ८२ प्रजातींचे पक्षी या विविध कारणांनी मृत्यू मुखी पडल्याची  नोंद घेतलेली  आहे.

रस्ता अपघातांची संख्या अधिक

रस्ता अपघाताने मृत्यू मुखी पडणाऱ्या पक्षी प्रजातींची सर्वात जास्त संख्या आहे. यामध्ये भारद्वाज, लाल बुड्या बुलबुल, ठीपकेवाला पिंगळा, साळुंकी, रातवा, नीलपंख,राखी वटवटा,होला,सातभाई, कोकीळ व चातक या प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे. तीन वर्षात एकूण १९१० पक्षी रस्ता अपघाताने मृत्यूमुखी पडलेले आढळून आले आहे. त्यामध्ये ५५ पक्षी प्रजातींचा समावेश आहे. जवळपास २ ते ३ पक्षी दर ३० कि.मी.च्या अंतरात मृत्यूमुखी पडतात असे आढळून आले आहे.

सविस्तर वाचा - गर्भवती मातांना सारीसह कोरोनाचा धोका, अशी घ्यावी काळजी

 अमरावती ते चांदूर रेल्वे राखीव जंगल
अमरावती ते परतवाडा आणि परतवाडा ते सेमाडोह मेळघाटातील जंगलातून जाणा-या  राज्य महामार्गाचा अभ्यास करण्यात आला. जिल्ह्यातील ०६ प्रमुख ठिकाणी तितर, बटेर, पाणकोंबडी, होला, हरियाल, आणि मोर या सारख्या पक्ष्यांची शिकार करुन विक्री केली जाते. यामध्ये देवगाव, मार्डी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या गावांचा समावेश आहे.



असा हाेताे मृत्यू
जिल्ह्यातील काही भागातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारांमुळे घुबड, क्रोंच, करकोचे आणि मोठे स्थलांतरित बदक मृत पावल्याची नोंद घेतलेली  आहे. अवकाळी वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे पोपट ,बगळे आणि कावळे मोठ्या संख्येने मुत्युमुखी पडलेले आढळून आले आहे. मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींचा जनुकीय अभ्यास सुध्दा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ०६ पक्ष्यांच्या प्रजातींची भारतातून प्रथमच माहिती जनुकीय बँकेमध्ये जमा करण्याचा मान प्रा. अमोल रावणकर यांना मिळालेला आहे. पक्षी प्रजातींचे रस्ता अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कसे कमी करता येईल यासाठी आणखी संशोधन आणि उपाय योजनांची गरज आहे अशी माहिती शोधप्रबंधाचे मार्गदर्शक व  पक्षी अभ्यासक  प्रा.डॉ.गजानन वाघ यांनी दिलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com