esakal | पै-पै जोडले आणि चोराने लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पै-पै जोडले आणि चोराने लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या मजुराच्या खिशातील रोख चोरट्याने लंपास केली. बरौनी एक्‍स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे ही घटना घडली. पै-पै करून कुटुंबीयांना देण्यासाठी गाठीशी जोडलेले पैसे चोरीला गेल्याने अश्रू आवरणेही कठीण झाले होते.
सर्फराज अंसारी (30) असे प्रवाशाचे नाव आहे. तो मूळचा झारखंड राज्यातील बरौनीचा राहणारा आहे. सिकंदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतो. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गोळा होणारे पैसे तो गावी पोहोचवून देतो. गोळा झालेले 35 हजार रुपये घेऊन तो सहकाऱ्यासोबत गावी जात होता. रविवारी रात्री 07009 सिकंदराबाद-बरौनी एक्‍स्प्रेसच्या एस-7 क्रमांकाच्या बोगीतून त्याचा प्रवास सुरू होता. रात्रीची वेळ असल्याने थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला. चोरट्याने संधी साधून त्याच्या खिशातील रक्कम काढून घेतली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास गाडी सिरपूर कागजनगरजवळ असताना पैसे चोरी गेल्याचे त्याच्या लक्षात आले.
कासावीस झालेल्या सर्फराजने डब्यात पैशांचा शोध घेतला. परंतु, उपयोग झाला नाही. गाडी नागपूर स्थानकावर पोहोचताच त्याने लोहमार्ग ठाणे गाठून कैफियत मांडली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीची घटना कागजनगर स्थानक परिसरातील असल्याने हा गुन्हा तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे. 

loading image
go to top