esakal | रोहन गुरबानी भारतीय संघात
sakal

बोलून बातमी शोधा

रोहन गुरबानी

रोहन गुरबानी भारतीय संघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरचा बॅडमिंटनपटू रोहन गुरबानीची कझान (रशिया) येथे होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्‍व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. स्पर्धा 30 सप्टेंबर ते 13 ऑक्‍टोबरदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत तमिळनाडूच्या के. सतीशकुमारपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर असलेला 16 वर्षीय रोहन या स्पर्धेत मुलांच्या एकेरीत खेळणार आहे. स्पर्धेत सुरुवातीला मिश्र सांघिक स्पर्धा खेळली जाणार आहे. त्यानंतर वैयक्‍तिक गटातील सामने होतील. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी रोहन आठवडाभर चालणाऱ्या सराव शिबिरात सहभागी होईल. सांदीपनी शाळेचा विद्यार्थी असलेला रोहन ज्युनियर विश्‍व स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा नागपूरचा दुसरा युवा आणि एकूण चौथा बॅडमिंटनपटू ठरणार आहे. 2017 मध्ये सौरभ केऱ्हाळकर इंडोनेशियातील स्पर्धेत मिश्र दुहेरीत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. गत वर्षी मालविका बन्सोड व रितिका ठक्‍कर कॅनडा येथील विश्‍व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. गेल्या महिन्यात पंचकुला आणि बंगळूर येथे झालेल्या अखिल भारतीय ज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्यात आली. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात राष्ट्रीत विजेता असलेल्या रोहनने दोन्ही स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले होते. बंगळूरस्थित प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत सराव करणाऱ्या रोहनने यापूर्वी म्यानमार येथील 15 व 17 वर्षांखालील आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.  

loading image
go to top