RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Truck Blocks Samruddhi Highway After RTO Action: कागदपत्रे परत मिळण्यास विलंब झाल्याच्या रागातून चालकाने समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली.
Truck Blocks Samruddhi Highway

Truck Blocks Samruddhi Highway

esakal

Updated on

वर्धा: येथील समृद्धी महामार्गावर रविवारी (ता. ९) दुपारी एका ट्रक चालकाच्या संतापामुळे मोठी खळबळ उडाली. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाच्या कारवाईला कंटाळून चालकाने आपला ट्रक थेट मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आडवा उभा केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा येळाकेळी इंटरचेंजपर्यंत पोहोचल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com