esakal | CoronaVirus : राहा सावधान! अमरावतीत आजारापेक्षा अफवांचेच पेव

बोलून बातमी शोधा

fake

अमरावती शहरात कोरोनाचा एक संशयित रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाला असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरविली जात होती. तर हा रुग्ण शहरातील सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा असून तो प्रवीण लोणचे या कंपनीत कामावर असल्याचे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले होते.

CoronaVirus : राहा सावधान! अमरावतीत आजारापेक्षा अफवांचेच पेव

sakal_logo
By
अरुण जोशी

अमरावती : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे फक्त चीनमध्येच साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरस आता महाराष्ट्रात धडकला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता 5 वर पोहचली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

अशातच आज सकाळपासून अमरावती शहरातील सोशल मीडियावर एक ( फेक ) फोटो व्हायरल करण्यात आला असून या फोटो मध्ये अमरावती शहरात कोरोनाचा एक संशयित रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाला असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरविली जात होती. तर हा रुग्ण शहरातील सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा असून तो प्रवीण लोणचे या कंपनीत कामावर असल्याचे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले होते. मात्र हा मेसेज पूर्णतः खोटा असून अमरावती शहरात तसेच जिल्ह्यात कोणताही कोरोना संशयित रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - दारूच्या नशेत भाऊ चाकू घेऊन धावला आईच्या मागे, तेवढ्यात लहान भावाने केले हे...

तर सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने एक पत्रक काढून सोशल मीडियावर पसरविण्यात येत असलेला मॅसेज पूर्णतः खोटा असून दोन्ही विद्यार्थी पूर्णपणे स्वस्थ असून महाविद्यालयात हजर आहेत. अशा प्रकारच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेऊन नका तसेच जो कोणी अशा प्रकारच्या अफवा पसरवीत असेल त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.