
लाखनी (जि. भंडारा) : जंगलातून धावत धावत गावात आलेले हरिण घाबरून अर्धवट बुजवलेल्या विहिरीत पडले. त्यामुळे ग्रीन फ्रेण्ड्स नेचर क्लबच्या मदतीने नागरिकांनी हरणाला बाहेर काढून उपचार केले. नंतर ते वनविभागाला सोपवण्यात आले. दरम्यान, हरिण पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी उसळली होती.
लाखनी येथे गुरुवारी काळवीट जातीचे मादी हरिण राष्ट्रीय महामार्गाने धावत आले. लोकांची गर्दी बघून घाबरलेले हरिण साई टायपिंग स्कूलजवळ अर्धवट बुजवलेल्या अरुंद विहिरीत पडले. याबाबत ऍड. चंदन रणदिवे यांनी ग्रीन फ्रेण्ड्स नेचर क्लबचे प्रा. अशोक गायधने यांना कळविले. त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन गर्दी नियंत्रित केली.
लाखनी व साकोली येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. वनविभागाचे पथक घटनास्थळी येईपर्यंत हरिण बाहेर निघण्यासाठी धडपड करीत होते. यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. जमावाच्या मदतीने प्रा. अशोक गायधने, सोपानदेव काशिकर, सईद शेख, अस्पाक अली सय्यद, नगरसेवक महेश आकरे, रितेश कांबळे, सचिन घाटबांधे, शिवम हेमणे, अथर्व गायधने, पंकज भिवगडे, रवी पंचबुद्धे यांनी हरणाला बाहेर काढले. ते सैरावैरा पळून जाऊ नये म्हणून त्याचे मागील पाय दोरीने बांधून त्याला सुरक्षित ठेवण्यात आले.
वनविभागाचे कर्मचारी आल्यावर वाहनातून हरणाला पशुचिकित्सालयात नेण्यात आले. पशुचिकित्सक डॉ. गुणवंत भडके यांनी उपचार करून हरणाला दोन दिवस निरीक्षणात ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला जांभळी येथील रोपवाटिकेत नेण्यात आले. या कारवाईत लाखनीचे वनक्षेत्र सहायक डी. के. राऊत, गुणीराम मेंढे, वनरक्षक सय्यद, आर. आर. चवरे यांनी सहभाग घेतला. भंडारा भंडारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.