esakal | मराठा सेवा संघाचा आधारवड हरवला; नेते सचिन चौधरी यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा सेवा संघाचा आधारवड हरवला; नेते सचिन चौधरी यांचे निधन

मराठा सेवा संघाचा आधारवड हरवला; नेते सचिन चौधरी यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर (जि. यवतमाळ) : मराठा सेवा संघाचे वैचारिक व कृतिशील आधारस्तंभ, जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजाचे महासचिव, विविध पुरोगामी चळवळीतील संवेदनशील नेतृत्व, अभियंता संघटनेचे नेता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती येथील अभियंता सचिन चौधरी यांचे बुधवारी (ता. २१) दुपारी दोन वाजता कर्करोगाने निधन झाले. (Sachin-Chaudhary-passes-away-Yavatmal-District-news-Maratha-Seva-Sangh-nad86)

पोटात दुखत असल्याने त्यांना मागील महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे कर्करोगाचे निदान झाले. नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कर्करोगाने अवघ्या काही दिवसांतच त्यांना आपल्या कवेत घेतले व शेवटी मृत्यूच्या झुंजीत ते हरले. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी उपायुक्त प्रीती, दोन मुली, आईवडील, दोन भाऊ, एक बहीण असा आप्तपरिवार आहे.

हेही वाचा: पुढील दोन दिवस जोरदार; प्रादेशिक हवामान विभागातर्फे इशारा

नेर येथील शिवाजी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिवसरात्र ते सामाजिक कार्यात अक्षरशः झोकून देत होते. त्यामुळे धडाडीचे व्यक्तिमत्त्व असलेल्या सचिन चौधरी यांच्या अचानक एक्झिटने अनेकांच्या मनाला चटका लावला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा सेवा संघाचा आधारवड हरवल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(Sachin-Chaudhary-passes-away-Yavatmal-District-news-Maratha-Seva-Sangh-nad86)

loading image