Yavatmal Student News : मुंबईतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंबीयांचा दोन महिन्यांपासून पाठपुरावा; आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा

Sahil Wakode Death Case: मुंबईतील हॉस्टेलमध्ये साहिल वाकोडे याच्या मृत्यूला दोन महिने उलटूनही कारवाई न झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. न्यायासाठी वडिलांनी मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Sahil Wakode Death Case

Sahil Wakode Death Case

esakal

Updated on: 

यवतमाळ : मुंबईतील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या यवतमाळच्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या मृत्यूला दोन महिने उलटूनही कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी मंगळवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत केला. आता कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Loading content, please wait...